जिव्हाळा प्रतिष्ठान व स्वामिनी फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण; उपळे दुमाला येथे वृक्षारोपणाचा उपक्रम
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : उपळे दुमाला (ता. बार्शी) : जिव्हाळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, स्वामिनी फाउंडेशन व ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने जिव्हाळा प्रतिष्ठानच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी उपळे दुमाला येथील ओम मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूरचे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी निलेश देठे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बार्शीचे तहसीलदार एफ. आर. शेख, बार्शी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. राहुल तुळशीदास झालटे, ग्राहक समितीचे प्रदेशाध्यक्ष तानाजी गुंड, जिव्हाळा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा ग्राहक समिती महाराष्ट्र राज्याचे प्रदेश कार्याध्यक्ष सतीशकुमार बुरगुटे, ग्राहक समिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मुस्ताक मिस्त्री, ग्राहक समिती मराठवाडा अध्यक्ष बाळासाहेब शिंदे तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रा. राजेश पुजारी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वामिनी फाउंडेशनच्या वतीने ३०० वृक्ष लागवडीचा संकल्प राबविण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २५ मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वप्निल बुरगुटे, रामेश्वर बरबडे, लखन भालेराव, आदित्य मगर, महादेव भिसे, दादा खांडेकर, तात्या रोडे आणि नितीन शेळके यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. इंद्रजीत पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन उमाकांत ढावारे यांनी केले.
या सोहळ्यासाठी लातूर, नांदेड, पुणे, अहमदनगर, सांगली, सोलापूर, मुंबई आणि यवतमाळ येथून पुरस्कारार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर वखारिया विद्यालय, उपळे दुमाला यांच्या प्रांगणातही वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या उपक्रमात तहसीलदार एफ. आर. शेख, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी निलेश देठे, जिव्हाळा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सतीशकुमार बुरगुटे, ग्राहक समितीचे तानाजी गुंड, वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जाधव साहेब, पोलीस हवालदार पवार साहेब, पाटील साहेब, कोलते साहेब तसेच विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





