खत खरेदी आता डिजिटल; शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचे ‘FFFS ॲप’, रांगांपासून मुक्ती, घरबसल्या बुकिंग व एमआरपीत खताची हमी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : शेतकऱ्यांना खतांसाठी दुकानाबाहेर रांगा लावण्याची गरज आता संपली आहे. खत खरेदी अधिक पारदर्शक, सोपी आणि डिजिटल करण्यासाठी कृषी विभागाने ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFFS App) हे मोबाईल ॲप सुरू केले आहे.

या ॲपमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या कोणत्या दुकानात कोणते खत उपलब्ध आहे आणि त्याचा किती साठा आहे, याची माहिती मोबाईलवर मिळणार आहे. तसेच शेतजमिनीच्या क्षेत्रानुसार खतांचे आगाऊ बुकिंग (Advance Booking) करता येणार आहे.

ॲपचे ठळक फायदे –

आगाऊ बुकिंग: रांगेत उभे राहण्याची गरज नाही. घरबसल्या खत बुक करता येईल.

खताची हमी: ॲपवरून बुक केल्यानंतर संबंधित दुकानदाराला ते खत देणे बंधनकारक राहील.

२ दिवसांची मुभा: बुकिंग केल्यापासून पुढील २ दिवसांत (T+2) शेतकरी स्वतः किंवा कुटुंबातील प्रतिनिधी दुकानात जाऊन खत घेऊ शकतो.

एमआरपी दर: छापील किमतीपेक्षा (MRP) जास्त दराने विक्री होणार नाही.500लिंकिंगला आळा: अनुदानित खतांसोबत टॉनिक, औषधे यांसारख्या इतर कृषी निविष्ठा घेण्याची सक्ती दुकानदार करू शकणार नाही. सक्ती केल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा.

हे ॲप गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध असून शेतकऱ्यांनी https://play.google.com/store/apps/details?id=com.agristack.fsas या लिंकवरून डाउनलोड करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

ॲप वापराबाबत अडचण आल्यास गावातील कृषी सखी, कृषी मित्र, पोक्रा समूह सहाय्यक, आत्मा ATM / BTM, सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. सर्व शेतकऱ्यांनी या नव्या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन वेळ व पैशाची बचत करावी, असे आवाहन कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने करण्यात आले आहे.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या