पुराचे पाणी दुष्काळी तालुक्यांकडे वळवा; धरणांतील विसर्गाचे नियोजन करा -पालकमंत्री शंभूराज देसाई

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सातारा : जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे मुख्य धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पुरपरिस्थिती लक्षात घेता सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहून पूर्णपणे सज्ज राहावे. तसेच अतिरिक्त ठरत असलेले पुराचे पाणी दुष्काळी तालुक्यांकडे वळवून तेथील तलाव आणि बंधारे प्राधान्याने भरून घ्यावेत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री देसाई यांनी जिल्ह्यातील पुरपरिस्थितीचा आणि आपत्कालीन उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.500धरणांमध्ये सध्या पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे सखल भागात किंवा नदीकाठच्या परिसरात पुरपरिस्थिती निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने धरणांमधून पाणी विसर्गाचे काटेकोर नियोजन असे निर्देश देवून पालकमंत्री देसाई म्हणाले, पावसाचा अतिरिक्त जोर असल्यास आणि नद्यांना पूर आल्यास, ते पाणी वाया जाऊ न देता कालवे आणि उपसा सिंचन योजनांद्वारे दुष्काळी भागातील तलाव आणि बंधाऱ्यांमध्ये सोडावे, जेणेकरून त्या भागातील पाण्याचा प्रश्न सुटेल.

पाटण तालुक्यातील दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांच्या पुनर्वसनाची जी कामे प्रलंबित आहेत, त्यांना गती देऊन ती प्राधान्याने पूर्ण करावीत. ज्या गावांच्या पुनर्वसनासाठी जागा नाही अशा गावांच्या पुनर्वसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय पहाणी करुन जागेचा शोध घ्यावा.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या