बार्शीच्या रामभाई शहा रक्तपेढी ला मिळाली अत्याधुनिक सोयीनी युक्त अशी रक्त संकलन मोबाईल व्हॅन

B1न्यूज मराठी नेटवर्क
आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संघटनेच्या दिल्ली शाखेतुन बार्शीत दाखल
बार्शी : इंडीयन रेडक्रॉस सोसायटी शाखा बार्शी संचलीत श्रीमान रामभाई शाह रक्तपेढी च्या रक्त संकलनासाठी आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संघटनेच्या सहकार्याने अत्याधुनिक सोयीनी युक्त अशी मोबाईल व्हॅन देणगीव्दारे मिळाली आहे. आज या व्हॅनचा लोकार्पण सोहळा इंडीयन रेडक्रॉस सोसायटी उपशाखा बार्शीचे मानद सचिव अजित कुंकुलोळ यांच्या हस्ते करण्यात आला.ब्लड बँकेच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमाला शाह ब्लड सेंटरचे चेअरमन डॉ.विक्रम निमकर ,रेडक्रॉस चे उपाध्यक्ष अशोक डहाळे, डॉ लक्ष्मीकांत काबरा, प्रताप जगदाळे, धन्याकुमार शाह, विवेकानंद देवणे, कल्याण घळके, प्रमोद भंडारी , सुरेश हुकिरे, प्रशांत बुदुख, विजय दिवानजी, संतोष सूर्यवंशी, अजय तिवारी, राहुल वाणी, दिनेश कांकरिया उपस्थित होते.
ब्लड सेंटर आपल्या दारी ही संकल्पना घेऊन व काळाची गरज ओळखून रक्त संकलनासाठी बार्शीच्या शाह ब्लड सेंटरला आंतरराष्ट्रीय इंडीयन रेडक्रॉस सोसायटीच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयातून ही आधुनिक व्हॅन मिळाली आहे. सुमारे 46 लाख रूपयांच्या या व्हॅनमध्ये एकावेळी तिघेजण आरामदायी पध्दतने रक्तदान करू शकतात.
या व्हॅनमध्ये रक्तदात्यांचे फॉर्म भरणे, टेस्टींग करणे, फ्रिज ,टीव्ही, साऊंड सिस्टिम , यासह लॅपटॉप प्राजेक्टरची देखील सोय आहे. जेणे करून रक्तदान चळवळ अधिक व्यापक करणे व रक्तदात्यांची योग्य ती काळजी घेणे संयोजकांना सहज सुलभ होणार आहे. ग्रामीण भागात रक्तदान शिबीर घेणे यामुळे या पुढे शाह ब्लड सेंटरला अधिक सोपे जाणार आहे.
यापूर्वी शाह ब्लड सेंटरकडे स्वमालकीच्या दोन आधुनिक रक्त संकलनासाठीच्या मोबाईल व्हॅन सेवेत आहेत. आता ही तिसरी व अत्याधुनिक मोबाईल व्हॅन आल्याने रक्त संकलनासाठी व शिबीरासाठी होणारा अनावश्यक खर्च व वेळेची बचत होणार असल्याची माहिती शाह ब्लड सेंटरचे अध्यक्ष डॉ विक्रम निमकर यांनी दिली.
आज लोकार्पण सोहळ्यानंतर बालरोगतज्ज्ञ डॉ सुनील पाटील व अमिता पाटील दांपत्यांनी रक्तदान केके. त्यांचे जोडीने रक्तदान करण्याची ही 15 वी वेळ आहे.