बार्शीमहाराष्ट्रशैक्षणिक

चाणक्य संदीप आलाटचा बारावी मध्ये महाराष्ट्र विद्यालया मधून किमान कौशल्य शाखेत प्रथम क्रमांक!

जिद्द , मेहनत आणि कठीण परिस्थितीवर मात करत चाणक्य संदीप आलाटचा उल्लेखनीय प्रवास

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : २ मे २०२६ रोजी जाहीर झालेल्या एच.एस.सी. बोर्ड निकालात महाराष्ट्र विद्यालयाच्या किमान कौशल्य शाखेतून चाणक्य संदीप आलाट यांनी उल्लेखनीय यश संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला. ७५.७८ टक्के गुण मिळवत त्यांनी आपल्या मेहनतीचा ठसा उमटवला असून, त्यांच्या यशामुळे विद्यालयासह कुटुंबाचा अभिमान उंचावला आहे.50000अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या चाणक्यने शिक्षणात सातत्य ठेवत प्रत्येक अडचणीवर मात केली. त्यांच्या या यशामागे त्यांची चिकाटी, अभ्यासू वृत्ती आणि कुटुंबाचे पाठबळ महत्त्वाचे ठरले. विशेष म्हणजे, त्यांच्या वडिलांनी पत्रकारिता आणि सामाजिक कार्य करत मुलाच्या शिक्षणासाठी मोठे कष्ट घेतले. आज चाणक्यने मिळवलेले यश हे त्यांच्या त्या कष्टांचे फलित मानले जात आहे.5099या यशामुळे चाणक्य संदीप आलाट हे इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, किमान कौशल्य शाखेतील विद्यार्थ्यांनीही मोठे यश मिळवू शकतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्र विद्यालयाच्या या यशस्वी विद्यार्थ्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.5009

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button