प्रा.विशालगरड यांना ‘राष्ट्रीयगौरव पुरस्कार’
B1न्यूज मराठी नेटवर्क
गोवा, पणजी, बार्शी : महाराष्ट्रातील ख्यातनाम लोकव्याख्यानकार प्रा.विशाल गरड (बार्शी) यांना गोवा येथे ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित या सोहळ्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा. गरड यांनी प्रबोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. पणजी येथील कला अकादमी पणजी येथे झालेल्या या कार्यक्रमास गोव्याचे सामाजिक न्याय मंत्री सुभाष फळ देसाई, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत, तसेच संघटनेचे संस्थापक राजा माने यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. गरड यांनी हा सन्मान देशातील पत्रकारांना अर्पण करत पुढील काळातही प्रबोधन चळवळीत सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातील पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.





