कृषीपरभणीमहाराष्ट्रमेळावा

परभणीत २९ नोव्हेंबरला कृषी पदवीधरांसाठी ‘महा मेगा भरती’ २०० हून अधिक पदांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार मेळावा परभणी जिल्ह्यातील युवक-युवतींना नोकरीची संधी

B1न्यूज मराठी नेटवर्क350

परभणी : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी परभणी येथे कृषी पदवीधारकांसाठी ‘महा मेगा भरती’ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून २०० हून अधिक पदांसाठी उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

हा रोजगार मेळावा रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे संपर्क कार्यालय, जिंतूर रोड, परभणी येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध नामांकित व प्रतिष्ठित उद्योजक तसेच प्रामुख्याने पालवी अॅग्रीको प्रायव्हेट लिमिटेड सहभागी होणार असून, उपलब्ध पदांसाठी प्रत्यक्ष मुलाखती घेऊन उमेदवारांची निवड व भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.350या रोजगार मेळाव्यात कृषी क्षेत्रातील पदवीधरांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. बी.एस्सी. अॅग्री, एम.एस्सी. अॅग्री, अॅग्रीकल्चर डिप्लोमा तसेच बी.एस्सी. शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. परभणी जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधीमध्ये प्रथम प्राधान्य दिले जाणार असल्याने स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांसाठी ही महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्र.सो. खंदारे यांनी कळविले आहे.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button