आरोग्यउद्घाटनजालनामहाराष्ट्र

गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेला प्राधान्य; तीन महिन्यांनी पुन्हा घेणार कामाचा लेखाजोखा! – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर

महाराष्ट्र आरोग्य संपन्न करण्यासाठी आरोग्य संवाद यात्रा जालन्यात, अंबड येथे 23.84 कोटी रुपये खर्चाच्या श्रेणीवर्धित 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण

B1न्यूज मराठी नेटवर्क350

जालना : राज्यातील नागरिकांना दर्जेदार, सर्वसमावेशक आणि सहज उपलब्ध आरोग्य सेवा देऊन महाराष्ट्र आरोग्य संपन्न करण्याच्या उद्देशाने आरोग्य संवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे. सरकारी आरोग्य यंत्रणेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करण्यासह आरोग्य सेवांचा दर्जा उंचावणे, हा या यात्रेचा प्रमुख उद्देश असून, पुन्हा तीन महिन्यांनी आढावा घेणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

अंबड येथील 23.84 कोटी रुपये निधीतून श्रेणीवर्धित करण्यात आलेल्या 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या नव्या सुविधांबद्दल अभिनंदन करत आरोग्य विभागाने नागरिकांच्या अपेक्षांनुसार सेवा देण्यावर भर द्यावा, असे निर्देश दिले.350आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळणे अपेक्षित आहे. मात्र, महात्मा फुले जनआरोग्य योजनेसारख्या योजनांमधून नागरिकांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. आरोग्य सेवांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असताना त्याचा प्रत्यक्ष लाभ रुग्णांपर्यंत पोहोचतो का, याची तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे आरोग्य संस्थांमधील सुविधांची उपलब्धता, सेवांचा दर्जा आणि कामकाजातील उणिवांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री आबिटकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

आरोग्य सेवांचा तीन महिन्यांनी पुन्हा आढावा

आरोग्य संवाद यात्रेच्या माध्यमातून आरोग्य संस्थांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या, आरोग्य सुविधांची स्थिती आणि रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांचा आढावा घेतला जात आहे. पुढील तीन महिन्यांनी पुन्हा आढावा घेऊन आरोग्य विभागाने किती सुधारणा केल्या, किती रुग्णांना उपचार मिळाले आणि योजनांचा लाभ किती नागरिकांपर्यंत पोहोचला, याची पडताळणी करणार आहे. पदाचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी झाला पाहिजे, ही भूमिका घेऊन आरोग्य विभाग काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.350राज्यात 15 ऑगस्ट रोजी 115 रुग्णालयांचे लोकार्पण करण्यात आले आहे. आगामी काळात आणखी 125 आरोग्य मंदिरांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. शासनाच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या आरोग्य संस्थांमध्ये केवळ इमारती उभारणे नव्हे, तर त्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध होणे महत्त्वाचे असल्याचे सांगून ते म्हणाले की, नागरिकांना खासगी रुग्णालयांमधील खर्चाचा भार कमी करून शासकीय रुग्णालयांतून प्रभावी उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्नशील राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

राज्य शासन दुष्काळी परिस्थितीतही शेतकरी व नागरिकांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत देत आहे. संकटांचा सामना करणाऱ्या नागरिकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून, आरोग्य विभागानेही संवेदनशीलतेने आणि विश्वासाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.350यावेळी हृदयशस्त्रक्रिया झालेल्या बालकांचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत बालकांच्या हृदयावरील शस्त्रक्रियांसारखे उपचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार नारायण कुचे यांनी मनोगत व्यक्त करत अंबड येथे सुंदर व भव्य उपजिल्हा रुग्णालयाची इमारत उभारण्यात आल्याचे सांगितले. रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानिक स्तरावर राहून रुग्णसेवा करण्यावर भर द्यावा. तसेच‌ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनीही आरोग्य यंत्रणेच्या कामकाजाची नियमित पाहणी करून सेवांचा दर्जा उंचावण्याचे आवाहन केले. आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, प्रसूती कक्ष, शस्त्रक्रिया गृह, अपघात विभाग, क्ष-किरण विभाग, सोनोग्राफी विभाग आणि प्रयोगशाळा आदी विभागांची पाहणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता जाधव यांनी केले तर आभार विजय बनसोडे यांनी मानले.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button