वानखेडेवर टीम इंडियाचा ‘विराट’ विजय; इंग्लंडला धूळ चारत भारत टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत! भारताचा 7 धावांनी विजय

0

टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये एन्ट्री, बेथेलचं शतक पाण्यात..

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

मुंबई : टी20 वर्ल्डकप दुसऱ्या सेमीफायनलमध्ये संजू सॅमसनच्या वादळी खेळीने आणि शिवम दुबेच्या स्फोटक फलंदाजीने इंग्लंडसमोर 254 धावांचं बलाढ्य आव्हान ठेवलं आहे २०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने इंग्लंडचा धुव्वा उडवत दिमाखदार विजय नोंदवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
इंग्लंडला तिसरी विकेट विल जॅक्सने मिळवून दिली.

त्याने संजू सॅमसनला फिल सॉल्टच्या हाती झेल देत बाद केले.सॅमसनने 42 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांच्या जोरावर 89 धावा करत तुफानी खेळी केली, पण शतकापासून तो थोडक्यात दूर राहिला.50000तुफानी फलंदाजी, अचूक गोलंदाजी आणि भेदक क्षेत्ररक्षणाच्या जोरावर भारताने सामन्यावर सुरुवातीपासूनच पकड कायम ठेवली. या दमदार कामगिरीमुळे कोट्यवधी भारतीय चाहत्यांच्या आशा आता विजेतेपदावर खिळल्या आहेत.

भारताने इंग्लंडसमोर 254 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने 20 षटकांत सात गडी गमावून 253 धावा केल्या.टीम इंडियाकडून संजू समनने 42 चेंडूत 89 धावांची दमदार खेळी केली. तर शिवम दुबेने 43 धावा केल्या. या सामन्यात इंग्लंडकडून आदिल रशीद आणि विल जॅक्सने प्रत्येकी दोन बळी घेतले आणि जोफ्रा आर्चरने 1 विकेट घेतली.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या