महाराष्ट्रसोलापूर

प्रा. ज्योती वाघमारे यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

सोलापूर : सोलापूर साठी आनंदाची बातमी समोर येत आहे. शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून राज्यसभेसाठी सोलापूरच्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आले आहे. बुधवार पर्यंत शिवसेनेकडून राहुल शेवाळे आणि गजानन कीर्तिकर यांच्या नावाचे चर्चा होते परंतु गुरुवारी प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.50000

वाघमारे यांचे नाव राज्यसभेसाठी आल्याने सोलापुरातून सर्व स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे. एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांना न्याय दिला अशी चर्चा आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना ज्योती वाघमारे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 2024 ची लोकसभा 2024 ची विधानसभा निवडणूक प्रचाराची जबाबदारी ज्योती वाघमारे यांनी सांभाळली. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते पद सांभाळताना त्यांनी पक्षाची बाजू राज्यस्तरावर जोरदार लावून धरली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांच्या कार्याची दखल घेत राज्यसभेची उमेदवारी बहाल केली आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button