येडेश्वरी शुगर खामगाव या साखर कारखान्यावर बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे गेट बंद आंदोलन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : चालू हंगामातील ऊसाला पहिली उचल तीन हजार रुपये द्यावी याकरिता बार्शी तालुक्यातील विविध शेतकरी संघटनेसह संभाजी ब्रिगेडच्या वतीने येडेश्वरी शुगरच्या गेटला बंद करत शेतकऱ्यांनी आंदोलन केले यावेळी कारखान्याला आजूबाजूचे सर्व साखर कारखाने शेतकऱ्यांना पहिली उचल 3000 किंवा त्यापेक्षा अधिक देत आहेत परंतु आपण 28 रुपयांना उचललेली आहे. यामुळे हा शेतकऱ्यांवरती अन्याय आहे हा न्याय शेतकरी संघटना व आम्ही सर्वजण खपवून घेणार नाही त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही हा लढा लढू असे आनंद आनंद काशीद यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले.

तर शेतकरी संघटनेचे शंकर गायकवाड यांनी या कारखान्याने आतापर्यंत शेतकऱ्यांना खूप लुटला आहे यापुढे आम्ही लुटू देणार नाही शेतकऱ्यावरचा आणि खपवून घेणार नाही आणि शेतकऱ्यांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढा लढत राहू आणि न्याय मिळवून घेऊ असे मनोगत व्यक्त केले.

तर शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते हनुमंतराव भोसले यांनी शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर घेणं आणि कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना प्राधान्य देणे ही देखील जबाबदारी हा कारखान्याचे असल्यामुळे त्यांनी त्यासाठी प्राधान्य देणं गरजेचं असल्याचे विचार व्यक्त केले.

या आंदोलनावेळी विकास बारबोले, सदानंद आगलावे, समाधान भालेराव, रवींद्र मुठाळ, आदींनी मनोगत व्यक्त केले. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कृष्णा काशीद, विक्रम घायतिडक, जोतिराम शिंदे, विनोद व्हॅन्कलास, अतिश लोंढे, विष्णू शिंदे, किरण कानगुडे यांच्या सह परिसरातील शेतकऱ्यांनि मोठया प्रमाणत सहभाग घेतला या वेळी राजकुमार यावलकर यांच्या नियंत्रणत पोलीस बंदोबस्त मोठया प्रमाणात होता.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या