जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोकअदालत यशस्वीपणे संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे तसेच अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सोलापूर यांच्या अध्यक्षेताखाली १३ डिसेंबर २०२५ रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये चौथ्या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

सोलापूर स्थानिक न्यायालय तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ४३,६१० प्रलंबित प्रकरणे आणि ३९,२३६ दाखलपूर्व प्रकरणे अशी एकूण ८२,८४६ प्रकरणे लोकआदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सोलापूर जिल्हयातील एकुण ९,९४५ प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली व लोकअदालतीच्या माध्यमातून एकुण रक्कम रु. ५५,२५,७४,२४१/- इतके मुल्य असणा-या प्रकरणांमध्ये सांमजस्याने तडजोड करण्यात आली.

सदर लोकअदालतीमध्ये न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे तसेच विविध बँका, वित्तिय संस्था, सोलापूर पंचायत समिती दक्षिण सोलापूर, बीएसएनएल, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, शहर वाहतूक शाखा, तसेच विविध पोलिस स्टेशनचे अधिकारी यांनी सहभाग नोंदविला.

प्रलंबित प्रकरणे – राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजनापूर्वी ०८/१२/२०२५ ते दि. १२/१२/२०२५ या कालावधीमध्ये सोलापूर जिल्हयातील सर्व न्यायालयामध्ये विशेष मोहिम राबविण्यात आली. विशेष मोहिमेमध्ये एकुण ३,४६८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये एकूण ठेवलेली प्रलंबित प्रकरणे ४३६१०, तडजोड झालेली प्रलंबित प्रकरणे ३४०२ , प्रलंबित प्रकरणातील तडजोड रक्कम ४१,८२.९३,९०५/- इतकी आहे.

दाखलपूर्व प्रकरणे – या लोकअदालतीमध्ये दाखलपूर्व प्रकरणे ३९२३६, तडजोड झालेली दाखलपूर्व प्रकरणे ६५४३ तसेच दाखलपूर्व प्रकरणातील तडजोड रक्कम १३,४२,८०,३३६/- रूपये इतकी असून ५ वैवाहिक प्रकरणामध्ये सुध्दा तडजोड करण्यात आली आहे.

लोक अदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रशांत पेठकर, अधिक्षक शमशोद्दीन नदाफ, तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सर्व लोकअभिरक्षक, कर्मचारी वृंद, पॅनल विधीज्ञ तसेच जिल्हा न्यायालयीन कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या