नांदेड येथील 27 व्या क्रीडा महोत्सव 2025 स्पर्धेत सोलापूर विद्यापीठास 13 पदकासह सर्वसाधारण विजेतेपद
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : 27 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवामध्ये दैदिप्यमान यश संपादन केलेल्या खेळाडूंचा सत्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा.प्रकाश महानवर यांच्या हस्ते व मा.प्र-कुलगुरू प्रा.डॉ. लक्ष्मीकांत दामा तसेच प्रभारी कुलसचिव तथा क्रीडा संचालक डॉ.अतुल लकडे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला यावेळी विद्यापीठ संघाचे समन्वयक प्रा.बाळासाहेब वाघचवरे यांनी संपूर्ण संघाची कामगिरी याबद्दल सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
ॲथलेटिक्स या खेळामध्ये 13 पदकासह पुरूष विभागाने सर्वसाधारण विजेतेपद विद्यापीठ संघाने मिळविले यामध्ये 8 सुवर्ण,3 रजत,2 कांस्य,पदकांचा समावेश आहे. महिला विभागामध्ये 2 सुवर्ण व 2 रजत पदक मिळविले आहेत. या यशामध्ये संघाचे मार्गदर्शक डॉ.अशोक पाटील, डॉ.किरण चोकाककर व श्री धनंजय देशमुख संघ व्यवस्थापक यांचे ही अमुल्य सहकार्य लाभले सर्व खेळाडू, मार्गदर्शक,व्यवस्थापक, स्पर्धा समन्वयक व क्रीडा संचालक डॉ अतुल लकडे यांचा शाल व बुके देवून सत्कार करण्यात आला तसेच क्रीडा विभागातील कर्मचारी यांचा सुध्दा सत्कार मा.कुलगुरू प्रा.प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी खेळाडूंनी अशीच आपली कामगिरी करत विद्यापीठाचे व स्वत:चे नाव उज्वल करावे तसेच या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली उत्तम कामगिरी करावी अशा शुभेच्छा देवून विद्यापीठ सर्वतोपरी त्यांच्या पाठीशी राहील असे विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा.प्रकाश महानवर यांनी सांगितले तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवून जास्तीत जास्त पदक प्राप्त करण्यासाठी खेळाडूंना आवाहन केले त्यासाठी खेळाडूंनी मेहनत घ्यावी असे सांगितले खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी विद्यापीठा कडून जास्तीत जास्त आर्थिक मदत करण्यात येईल असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन क्रीडा महोत्सव स्पर्धा समन्वयक प्रा.बाळासाहेब वाघचवरे यांनी केले व शिवानंद मैलारी यांनी उपस्थित मान्यवर व खेळाडूंचे आभार मानले.




