नगराध्यक्ष पदाची अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्याॲड. सुप्रियाताई गुंड पाटील महिला मेळाव्यास उपस्थिती
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : नगराध्यक्ष पदाची निवडणूक संपल्यानंतरही अपक्ष उमेदवार ॲड. सुप्रियाताई गुंड पाटील सामाजिक कार्यात सक्रिय राहून महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेत आहेत. ग्रामीण भागातील महिलांना उद्योग व कायदेविषयक मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने एकता विचार मंच यांच्या वतीने गाताचीवाडी (ता. बार्शी) येथे महिला मेळाव्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहित्या.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. सुप्रियाताई गुंड पाटील उपस्थित होत्या. महिलांना कायद्याचे मूलभूत ज्ञान, उद्योग संधी, तसेच स्वावलंबनाच्या विविध मार्गांबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
मेळाव्याला आयुष व्यसनमुक्ती केंद्राचे डॉ. संदीप तांबारे, बार्शी पोलिस स्टेशनच्या निर्भया पथकाचे प्रमुख घाडगे साहेब, सरपंच विद्याताई गात, पोलिस पाटील घाडगे ताई, एकता विचार मंचाच्या कोषाध्यक्ष रेश्माताई मुकटे, प्रभाकर क्षीरसागर तसेच मंचाच्या महिला सदस्यांची उपस्थिती होती.
महिलांनी या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वावलंबनासाठी सातत्याने अशा मार्गदर्शनाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.




