पशुपालकांसाठी विविध योजना; लाभ घेण्याचे आवाहन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर, दि.९ : विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये सन २०२४-२५ ते २०२६-२७ या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा २ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश असून, ग्रामिण भागातील पशुपालकांच्या आर्थिक उन्ततीसाठी नमूद विविध योजना राबविण्यात येत आहेत, पशुपालकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. संजीव पाटील यांनी केले आहे.

योजना
१.५०टक्के अनुदानावर उच्च उत्पादन क्षमता असलेली १ गाय/म्हैस वाटप.
२. ७५ टक्के अनुदानावार उच्च उत्पादन क्षमता असलेल्या भृणांचे प्रत्यारोपण केलेली गाभण कालवड

वाटप.
३. २५ टक्के अनुदानावर प्रजनन पूरक खाद्य वाटप.
४.२५ टक्के अनुदानावर फॅट fat व snf वर्धक खाद्य

पुरवठा.
५. ५० टक्के अनुदानावर कडबा कुट्टी यंत्र वाटप.
६.१०० टक्के अनुदानावर बहुवार्षिक चार पीके/ ठोंबे

वाटप.
७.२५ टक्के अनुदानावर मुरघास वाटप.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त् पशुपालकांनी www.vmddp.com या संकेतस्थळावर भेट देऊन online पद्धतीने अर्ज करावे असे आवाहन जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, छपत्रती संभाजीनगर यांनी केले आहे. तसेच योजनासंबंधी अधिक माहितीकरिता डॉ. संजीव पाटील, जिल्हा प्रकल्प् अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांना 9975269831 या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा,असेही कळविण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या