इस्त्राईलमध्ये “Renovation Construction” क्षेत्रातील रोजगार संधी, उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) यांच्या माध्यमातून इस्त्राईल येथे “Renovation Construction” क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये प्लास्टरिंगचे काम – १००० जागा, सिरॅमिक टाइलिंग – १००० जागा, ड्रायवॉल कामगार – ३०० जागा, मेसन –३०० जागा रद्द करून देण्यात आलेल्या आहे तरी उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक संगीता खंदारे यांनी केले आहे.
पात्रता अटी २५ ते ५० वयोगटातील इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणारे उमेदवार पात्र असून, किमान ३ वर्षांचा अनुभव Renovation Construction क्षेत्रात असणे आवश्यक आहे. उमेदवाराने यापूर्वी इस्त्राईलमध्ये काम केलेले नसावे. तसेच त्यांचा/तिचा जोडीदार, पालक किंवा मुले इस्त्राईलमध्ये सध्या काम करत नसावेत किंवा रहिवासी नसावेत, अशी अट आहे.
अर्ज प्रक्रिया इच्छुक उमेदवारांनी Maharashtra International Portal वरील Latest Jobs या विभागात जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.
आवाहन जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक महाविद्यालयांनी ही माहिती अधिकाधिक उमेदवारांपर्यंत पोहोचवावी. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (नॉर्थ कोर्ट), पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा.
📞 दूरध्वनी क्र.: ०२१७-२९९२९५६
सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर श्रीमती संगीता खंदारे यांनी इच्छुक उमेदवारांना या रोजगार संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.




