श्री दत्त जयंती उत्सव २०२५ : महाद्वार चौकात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : श्री दत्त जयंती उत्सव २०२५ निमित्त महाव्दार चौकातील श्री दत्त मंदिरात दत्त सेवेकरी आरती मंडळाच्या वतीने श्री दत्त जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्त सेवेकरी आरती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री दत्त जन्मोत्सवाची सुरुवात बुधवार, दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता पालखी सोहळा व नगर प्रदक्षिणेने होणार आहे. बार्शी शहरातील प्रमुख मार्गांवरून भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
गुरुवार, दि. ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत श्री दत्त मूर्तीचा अभिषेक पार पडणार असून सकाळी ९.३० वाजता आरती होईल. त्याच दिवशी दुपारी १२.३० ते ३.३० या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व कार्यक्रम महाद्वार चौक, बार्शी येथे आयोजित करण्यात आले श्री दत्त सेवेकरी आरती मंडळ यांच्या वतीने सर्व श्री दत्त भक्तांनी या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




