B1न्यूज मराठी नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर, दि.१ : जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात आले. दि.१५ पर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत,असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी कळविले आहे.

जिल्हा रुग्णालयात आज सकाळी सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत जिल्हा सायकल संघटना, तेज्स्विनी सायकल क्लब, देवगिरी सायकलिंग क्लब आदी संस्था सहभागी झाल्या. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅली मार्गस्थ करण्यात आली. अतिरिक्त जिल्हा शक्य चिकित्सक डॉ. भुषणकुमार रामटेके, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नारायण सावरगावेकर, डॉ. अनुपम टाकळकर, डॉ. पद्मजा सराफ, डॉ.प्रशांत बडे, डॉ. अपर्णा जक्कल, डॉ. मनिष भोंडवे, क्षयरोग अधिकारी डॉ. एम.टी.साळवे, डॉ. पंडीत किल्लारीकर, डॉ. दीपमाला परदेशी, श्रीमती साधना गंगावणे, , जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पवार, जिल्हा पर्यवेक्षक विनोद मस्के, पंकज धुळे आदी उपस्थित होते.

डॉ.सकपाळ यांनी बाबा हिंदुस्थानी पथनाट्यातून जनजागृती केली. यावेळी एचआयव्ही, एड्स औषधोपचार सुविधा, सेवा देऊन उत्कृष्ट कार्य करणाऱ्य एआरटी केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी साधना गंगावणे यांनी सुत्रसंचालन सुनिता बनकर यांनी तर आभारप्रदर्शन सिताराम विधाते यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या