डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त कर्मवीर जलतरण तलाव स्पर्धेचे आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त “कर्मवीर जलतरण तलाव” या ठिकाणी श्री शिक्षण शास्त्र महाविद्यालय यांनी जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. महाविद्यालयीन गटामध्ये कुणाल लोखंडे बीए एलएलबी भाग 1 मधील स्पर्धकाने 50 मीटर ,100 मीटर फ्री स्टाईल , 50 मी , 100 मी बॅक स्ट्रोक व 50 मी , 100 मी ब्रेस्ट स्ट्रोक या सर्व प्रकारामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला , या यशाबद्दल प्रमाणपत्र व पुस्तक देऊन गौरव करण्यात आले .
स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. दत्तप्रसाद प्रेमलता मनोहर सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोनकांबळे आर. वाय. यांनी शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला , या प्रसंगी प्रा. शिकारे एम. पी. , प्रा. मिठा एम. एस., प्रा. साखरे दीपिका, प्रा. सुरवसे मॅडम, प्रा. समाधान काळे, प्रा. वडणे सर , प्रा.खोत, गव्हाणे एस. एस., कोळी के. वी., कोल्हे ए. जी. वाघे आर. जी. माने एम. एम. कृष्णा सातपुते, ठोंबरे एस. के., शेळके एस. एम.उपस्थित होते.
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव,उपाध्यक्ष नंदन जगदाळे,जनरल सेक्रेटरी पी. टी. पाटील , खजिनदार जयकुमार शितोळे, सहसचिव अरुणजी देबडवार सह सर्व पदाधिकारी , व सदस्य यांनी अभिनंदन केले.




