बार्शी ते मालवंडी रस्ता दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन, दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी ते मालवंडी मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरून शाळेची मुले तसेच शेतकरी यांना रोज ये-जा करावी लागते . या रस्त्यावर खुप मोठे खड्डे पडले आहेत. रस्ता पुर्ण खराब झाला आहे व पूल ५० % वाहून गेला आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी ही निवेदन दिले आहे . रस्ता रोखो आंदोलन ग्रामस्थांनी केले आहे. तरी सदरच्या रस्त्याचे काम केलेले नाही. तरी लवकरात लवकर रस्त्याचे काम व डांबरीकरण करून मिळावे या सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन कोरफळे ग्रामपंचायत व ग्रामस्थानी दिले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी होनमुटे यानी निवेदन घेऊन लगेच ठेकेदार याना फोन करून उद्याच चालू करण्याबाबत सूचना दिल्या जर 2 दिवसात दुरुस्तीच काम नाही, चालू झाला तर रास्ता रोको सारख पाऊल उचलण्याची वेळ येऊ देऊ नका असे सर्व गावकार्याबद्दल सांगण्यात आले.

यावेळी तानाजी शिंदे सरपंच कोरफळे, शंकर पाटील कोरफळे , अमोल पाटील बळेवाडी, करण मोरे सरपंच बळेवाडी, दत्तात्रय मुकटे गुळपोळी , नेताजी बरडे कोरफळे, भूषण कदम बळेवाडी, राजेश खाडे बळेवाडी, युवराज बारंगुळे, रवी वाळके कासारवाडी, विकास माने उपसरपंच कव्हे, उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या