अयोध्या : श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकला
B1न्यूज मराठी नेटवर्क
अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या पवित्र शिखरावर भगवा ध्वज आज विधीवत फडकवण्यात आला. मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास गेल्याचे हे प्रतीकात्मक चिन्ह मानले जात असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते.
मंदिरावर फडकवण्यात आलेला भगवा ध्वज समकोणी त्रिकोणी आकाराचा असून त्याची उंची 10 फूट व लांबी 20 फूट आहे. ध्वजावर तेजस्वी सूर्याची प्रतिमा असून ती प्रभू श्रीरामांच्या पराक्रमाचे आणि तेजस्वी वारशाचे प्रतीक मानली जाते. ध्वजावर ‘ॐ’ आणि कोविदार वृक्षाचाही समावेश करून आध्यात्मिकतेची आणि सांस्कृतिक परंपरेची जोड अधोरेखित करण्यात आली आहे.
हा पावन भगवा ध्वज गरिमा, एकता आणि सांस्कृतिक सातत्याचा संदेश देणारा म्हणून मंदिर परिसरात विशेष आकर्षण ठरला.




