डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाहिलेले व पायाला स्पर्श केलेल्या बार्शी भीमनगर मधील आई अनंतात व पंचतत्वात विलीन झाल्या..
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : दिनांक 21 सप्टेंबर रोजी वयाच्या 100 ते 105 या वयामध्ये यमुना (आई ) बोकेफोडे लगाड यांचे वृद्धपकाळाने दुःखद निधन निर्वाण झाले. भीमनगर मधील त्या सर्वात वृद्ध व दीर्घ आयुर्मान लाभलेल्या व्यक्ती होत्या.त्यांना भीमनगर मधील सर्व लहान थोर मंडळी आई असे संबोधायचे यमुना आई बोकेफोडे लगाड यांचे शिक्षण जुनी सातवी इतके झाले होते.यमुनाआई बोकेफोडे लगाड या माझे वडील कालकथित जालिंदर वैजिनाथ बोकेफोडे यांच्या त्या सख्खा आत्या होत्या.
यमुना आई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दोन वेळेस पाहिल्याचे सांगत असत. दिनांक 24 जानेवारी 1937 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रचाराच्या दौऱ्यासाठी बार्शीत आले होते. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला सोलापूर दौरा पूर्ण करून सुमारे दुपारी तीन वाजता बार्शीतील भगवंत मिल याठिकाणी पोहोचले.
त्यावेळी बार्शीतील तरुण पुढारी मनोहर दादा बोकेफोडे यांच्या समवेत बार्शीतील आठ ते नऊ हजार लोक सोलापूर रोड येथील भगवंत मिल या ठिकाणी उपस्थित होते त्या आठ ते नऊ हजार लोकांमध्ये यमुना आई बोकेफोडे लगाड याही उपस्थित होत्या. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक पोस्ट चौक जुने पोलीस स्टेशन काजी मज्जिद जैन मंदिर भाजी मार्केट या रस्त्याने म्युनिसिपल दवाखान्याजवळ उभारलेल्या भव्य मंडपामध्ये पोहचली व तेथून त्या काळातील महारवाडा व आत्ताचे भीमनगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नेण्यात आले.
त्यावेळी महारवाड्यातील महिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढे पाण्याने भरलेल्या घागरी ओतल्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महारवड्यातील पंचाच्या पारावर आले त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भीमनगर मधील महिलांनी मोठ्या प्रमाणात औक्षण केले त्यावेळी. यमुना आई बोकेफोडे लगाड यांनी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कुंकू लावले त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले माझा देव करू नका अशी माहिती मौखिक इतिहास यमुना आई यांनी सांगत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर पंचाच्या पारावर येणार आहेत त्यावेळेस पारावरची मरीआई झाकण्यात आली होती असेही यमुना आई यांनी सांगितले होते.
त्यानंतर दुसऱ्यांदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर बार्शी येथे आले.दिनांक 23 फेब्रुवारी 1941 रोजी तडवळे ढोकी येथे आयोजित सोलापूर जिल्हा व मोगलाई मराठवाडा भागातील महार मांग वतनदार परिषदेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तडवळे येथे जात असताना बार्शीतील रेल्वे टेशन बार्शी टाउन या ठिकाणी सुद्धा यमुना आई उपस्थित होत्या. अशा या इतिहासाच्या साक्षीदार यमुना आई बोकेफोडे लगाड यांचे वयाच्या 100 ते 105 व्या वर्षी दुःखद निधन निर्वाण झाले.
अशा या यमुना आई बोकेफोडे लगाड यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन
तानाजी बोकेफोडे
( जिल्हा कार्याध्यक्ष,भारत मुक्ती मोर्चा,सोलापूर )




