AIMIM पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार खाजाबी पठाण यांच्या प्रचारार्थ मा खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची जाहिर सभा
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 या निवडणुकीत AIMIM पक्षाने पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिल्याने शहराच्या राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. AIMIM पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून खाजाबी पठाण यांची घोषणा करण्यात आली आहे.
त्यांच्या प्रचारार्थ AIMIM चे प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची बार्शी येथे भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीAIMIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी दिली.
जिल्हाध्यक्ष पठाण म्हणाले, “बार्शीच्या इतिहासात प्रथमच AIMIM आपला उमेदवार रिंगणात उतरवत आहे. बार्शीकरांच्या सेवेसाठी आम्ही सर्व ताकदीने ही निवडणूक लढणार आहोत आणि विजय निश्चित आहे,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. AIMIM च्या या अनपेक्षित एन्ट्रीमुळे बार्शी नगराध्यक्षपदाची लढत अधिक चुरशीची होईल अशी चर्चा सध्या बार्शीत सुरू आहे




