स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : आपल्या कणखर, दूरदर्शी आणि धाडसी नेतृत्वामुळे जागतिक राजकारणात भारताला मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या, देशाच्या एकता-अखंडतेसाठी अद्वितीय बलिदान देणाऱ्या भारतरत्न, देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूर महानगरपालिका प्रांगणातील त्यांच्या पुतळ्यास खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते, शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी नगरसेवक प्रविण दादा निकाळजे, प्रदेश सचिव विनोद भोसले, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष जुबेरभाई कुरेशी, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, भटक्या-विमुक्त विभाग अध्यक्ष युवराज जाधव, सेवादल यंग ब्रिगेड युवक अध्यक्ष विवेक कन्ना, माजी नगरसेवक हरुण शेख, उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, बसवराज म्हेत्रे, अनिल मस्के, गिरीधर थोरात, लखन गायकवाड, शकील शेख, संजय गायकवाड, सागर उबाळे, इलियास शेख, कुणाला गायकवाड, गौतम मसलखांब, सुभाष वाघमारे, हाजी मलंग नदाफ, नूरअहमद नालवार, महेश सर्वगोड, माजी महिला अध्यक्षा अॅड. करीमुन्नीसा बागवान, सुमन जाधव, शोभा बोबे, शुभांगी लिंगराज, चंदा काळे, संघमित्रा चौधरी, डॉ. मीना गायकवाड, बालाजी जाधव, मेघशम गौडा, रफिक चकोले, शुकुर शेख, चंद्रकांत टिक्के, संजय कुराडे, आबा मिटकरी, आप्पा सलगर, ज्योती गायकवाड, मुमताज तांबोळी, रेखा बिनेकर, रुकीयाबानू बिराजदार, पूजा चव्हाण, अनिता भालेराव, चंद्रकला निजमल्लू, मीना गायकवाड, मोहसीन फुलारी, शिवाजी साळुंखे, नागनाथ शावणे, अभिलाष अच्युगटला, सुनील डोळसे, पंडित बुवा गणेशकर, रजाक तांबोळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




