राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जम्मू कश्मीरकडे रवाना

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

पुणे : जम्मू येथील वैष्णो धाम, कालिका धाम येथे होणाऱ्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा १९ वर्षाखालील मुला-मुलींचा संघ रवाना झाला. या संघाला क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले, क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

यापूर्वी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने श्री विठ्ठलराय जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे क्रीडा संकुल, डेरवण (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेतून राष्ट्रीयस्तरासाठी पुढीलप्रमाणे खेळाडूंची निवड करण्यात आली.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी १९ वर्षाखालील मुलामध्ये तेजस हर्षद वासणीकर, मयूरेश विवेक सावंत, प्रणव जयदिप घोळकर, रामानुज अमित जाधव आणि वेदांत नागेश खळदे तर १९ वर्षाखालील मुलीमध्ये उर्दी सिद्धार्थ चुरी, अन्वी शैलेश गुप्ते, अनुष्का संदीप पाटील, निहाली निवास पाटील आणि जान्हवी पराग फणसे यांचा समावेश आहे. संघासोबत प्रशिक्षक अनिल शंकरराव बंदेल, असद अली अब्दुल लतीफ सय्यद तसेच व्यवस्थापक कविता धोंडीराम देसाई आहेत.

याप्रसंगी खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापकांना जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या हस्ते गणवेश किटचे वाटप करण्यात आले. क्रीडा अधिकारी अश्विनी शिवानंद हत्तरगे आणि नानासाहेब तलवाडे उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या