सुयश विद्यालयाच्या विद्यार्थांचे राज्यस्तरीय स्पर्धे साठी निवड
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : अजय भुतडा फाउंडेशन यांच्या विद्यमाने आयोजित महाराष्ट्राची पहिली राज्यस्तरीय इंटर-स्कूल स्पर्धा 2025 दिनांक 15 नोव्हेंबर रोजी आर्चरी ग्राउंड, जिल्हा क्रीडा संकुल, सोलापूर येथे उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत सुयश विद्यालय, बार्शी येथील आर्चरी विभागातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून जिल्ह्यात नावलौकिक मिळविला.
स्पर्धेतील उल्लेखनीय विजयामध्ये— कु. समीक्षा अनिल नामदास – इंडियन राऊंड प्रथम क्रमांक
ह्रिदा स्वप्निल राजगुरू – कंपाउंड गट द्वितीय क्रमांक
या दोन्ही खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने सुयश विद्यालयात आनंदाचे वातावरण आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाचे संस्थापक शिवदास नलवडे, मार्गदर्शिका प्रतिभा नलवडे मॅडम, प्रसाद नलवडे सर, मुख्याध्यापिका श्रीमती अलका जगताप मॅडम, उपमुख्याध्यापक संदीप येवले सर तसेच क्रीडा शिक्षक अतुल जाधव सर यांनी खेळाडूंचे मन:पूर्वक अभिनंदन केले.
तसेच सुयश विद्यालय, बार्शी – कला, सांस्कृतिक व शारीरिक शिक्षण विभाग तसेच सुयश संकुल तर्फे दोन्ही खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.




