शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार-(MahaVISTAAR-AI’) मोबाईल अॅपचा वापर करावे
B1न्यूज मराठी नेटवर्क
अमरावती, दि. १४ : राज्यातील शेतकरी बांधवांसाठी कृषी विभागाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘महाविस्तार (MahaVISTAAR-AI)’ हे आधुनिक मोबाईल अॅप विकसित केले असून, शेतकऱ्यांना डिजिटल सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी हे अॅप अत्यंत उपयुक्त शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती व विकासासंदर्भात तांत्रिक सल्ला, हवामान अंदाज आदी बाबतची माहिती या ॲपव्दारे सुलभरित्या उपलब्ध होते. यानुषंगाने शेतकरी बंधुनी महाविस्तार (Mahavistaar AI’) मोबाईल ॲपचा वापर करावे. असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
या अॅपद्वारे पिकांसंबंधी तांत्रिक सल्ला, हवामानाचा अचूक अंदाज, मृदा आरोग्यपत्रिका, खतमात्रा गणक, किड व रोग ओळख व त्यांचे व्यवस्थापन, शेती मालाचे बाजारभाव तसेच विविध कृषी शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना सहज मिळणार आहे. स्थानिक शेतीविषयक माहितीही या अॅपमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.
महाडीबीटी प्लॅटफॉर्मला महाविस्तार अॅपशी जोडण्यात आले असून भविष्यात कृषी विभागाच्या सर्व सेवा व योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना हे एकच अॅप वापरावे लागणार आहे. त्यामुळे राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी हे मोबाईल अॅप डाउनलोड करून वापर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे कृषी विभागाव्दारे कळविण्यात आले आहे.
अॅपमधील विविध सेवा, सुविधा, चॅटबॉटचा वापर वाढावा आणि ‘महाविस्तार’ अॅपचा विस्तार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहचावा यासाठी ‘महाविस्तार’ मोबाईल ॲप डाऊनलोड करुन अधिकाधिक शेतकऱ्यांनी वापर करावे. असे आवाहन कृषी विभागाव्दारे करण्यात आले आहे.




