जेष्ठ नागरिकांसाठी 14567 राष्ट्रीय हेल्प लाईन क्रमांक

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

परभणी : सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारच्या सहकार्याने जेष्ठ नागरिकांसाठी 14567 राष्ट्रीय हेल्प लाईन ही सेवा देशभरातील सर्व राज्यात आणि केंद्रशाषित प्रदेशात वयोवृद्धांसाठी सुरू करण्यात आली आहे. जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्यामार्फत ही सेवा महाराष्ट्रात राबवली जाते.

महाराष्ट्रातील अंमलबजावणी : ऑगस्ट 2021 पासून सुरू झालेल्या या 14567 राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइनवर आतापर्यंत 4 लाखांहून अधिक कॉल्स आले असून, 30 हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष मदत करण्यात आली आहे.

हेल्पलाइनद्वारे मिळणाऱ्या मोफत प्रमुख सेवा: माहिती: आरोग्य, पोषण, निवारा, आश्रयगृह व वृद्धाश्रम, डे केअर सेंटर. याबाबत माहिती, मार्गदर्शन: कायदेविषयक, मालमत्ता व कौटुंबिक वादांमध्ये मोफत कायदेशीर सल्ला, पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007. भावनिक आधार – मानसिक आजार व चिंता, ताण, राग इत्यादी व्यवस्थापन. बेघर व अत्याचारग्रस्त वृद्धांसाठी मदत आणि पुनर्वसन, कुटुंबीयांशी संवाद, पोलिस प्रशासनाशी समन्वय, समुपदेशन.

“एल्डर लाईन 14567” ही केवळ हेल्पलाईन नाही तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासाचा हात, एक सुरक्षित आधार आहे. या माध्यमातून वयोवृद्धांच्या गरजा समजून घेतल्या जातात आणि त्यांना सन्मानाने जगता येईल यासाठी आवश्यक ती मदत दिली जाते. ज्येष्ठांसाठी ही सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी समाजातील प्रत्येकाने जागरूक व्हावे आणि सर्व गरजू वयोवृद्धांनी या एल्डर लाईनचा लाभ घ्यावा.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या