रिजवाना मेहंदी आर्टिस्ट च्या बेस्ट मेहंदी प्रशिक्षणार्थी चा सन्मान सोहळा बार्शी येथे पार पडला
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : मेहंदी कोर्सच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना व मुलींना प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट बनण्याची एक नवीन संधी महिलांना उपलब्ध करून दिलेली आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रोफेशनल ब्युटीशियन मोनाताई देवगिरकर यवतमाळ, सिल्व्हर ज्युबिली बालक मंदिर विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपालीताई गोरे, ॲड. तथा सामाजिक कार्यकर्त्या सुप्रियाताई गुंड पाटील व पत्रकार तथा निवेदिका नीता देव व बार्शी येथील पत्रकार बंधू आदी मान्यवर उपस्थित होते.
जिथे शहरांमध्ये प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट बनण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात ते आपल्या खेड्यापाड्यातील महिलांना अत्यल्प दरामध्ये सेवा देण्याचे काम स्टार सोशल फाउंडेशन करत आहे.
आज बार्शी येथे झालेल्या बक्षीस वितरण समारंभात अकरा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना बेस्ट मेहंदी आर्टिस्टच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
रिजवाना मेहंदी आर्टिस्ट च्या 45 दिवसांच्या मेहंदी कोर्स मध्ये उत्कृष्ट मेहंदी काढून आपल्या नवीन व्यवसायला सुरु करण्याऱ्या या क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांच्या लेकि आज त्यांचा सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यामध्ये असलेषा तुकाराम बहरवार,राजकन्या अशोक घुले,अन्नपूर्णा सुरेश मस्तुद,रिजवाना लियाकत तांबोळी,स्मिता पांडुरंग शिंदे,वर्षा नितीन मोरे,महेक अमीन पठाण,तमन्ना अमीन गोरे,ज्ञानेश्वरी हिरामण शिरसागर , शितल उमेश राऊत, सिमरन मुबारक शेख आदींना पुरस्काराचा मान मिळवला.




