श्री सद्गुरू सीताराम महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रीराम कथेचे आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील कासारवाडी येथील श्री सद्गुरू सीताराम महाराज मंदिरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पुण्यतिथी उत्सव साजरा होत आहे.या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सोमवार दि. १० नोव्हेंबर २०२५ ते सोमवार दि. १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत होणार आहे. सप्ताहाचे उद्घाटन प पू दत्त महाराज पिंपळगाव पान याच्या हस्ते कलश पूजनाने होईल.
या सप्ताहात वैभवी श्रीजी वृंदावन धाम यांच्या सुमधुर वाणीतील श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कथा दररोज सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत होणार आहे.
सोमवार दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता काल्याचे कीर्तन होणार आहे. या श्रीराम कथेचा आस्वाद सर्वांनी घ्यावा असे आवाहन लक्ष्मीबाई कदम यांनी केले आहे.




