शिक्षणामुळेच व्यक्तीचा ; समाजाचा आणि देशाचा विकास घडतो – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
B1न्यूज मराठी नेटवर्क
भुवनेश्वर दि. 8 : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. शिक्षणामुळे ज्ञानार्जनामुळे व्यक्तीचा विकास होतो. व्यक्तीच्या विकासातुन समाजाचा आणि समाजाच्या विकासातून देशाचा विकास घडतो. शिक्षणामुळे आणि ज्ञानार्जानामुळे व्यक्तीमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढतो. विज्ञान आणि शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे. गरिबीचा उद्धार शिक्षणातुनच होतो. शिक्षण हे वाघीणीच दुध आहे. जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाची कास धरा. शिक्षण आणि विज्ञानाचा प्रसार करा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.
भुवनेश्वर मधील कलिंग इन्सटुट ऑफ इंडस्ट्रीयल टेकॉनोलॉजी (किट)या विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शना करताना ना. रामदास आठवले बोलत होते. कलिंग विद्यापिठात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना खास विद्यापिठाने प्रमुख अतिथी म्हणुन निमत्रीत केले होते. कलिंग विद्यापिठाला ना. रामदास आठवले यांनी भेट दिली. कलिंग विद्यापिठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधुन मार्गदर्शन केले.कलिंग विद्यापिठाचे संस्थापक माजी खासदार अच्युता सामंता हे उपस्थित होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गोरगरिब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पिपल्स एज्यकेशन सोसायटी ही संस्था 1945 रोजी स्थापन केली आहे. या पिपल्स एज्यकेशन सोसायटीच्या देशभरातील महाविद्यालयामध्ये लाखो पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. या संस्थेतून अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आणि घडले आहेत.
अच्युता सामंत यांनी ही भुवनेश्वर मध्ये कलिंग विद्यापिठ स्थापन करुन शिक्षणाचा प्रसार करण्याचे चांगले काम करित आहेत. या शिक्षण क्षेत्रातील योगदाना बद्दल आपण त्यांचा येत्या 25 जानेवारी 2026 रोजी दुबई मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणार आहोत. त्या पुरस्कार सोहळ्यात दुबई येथे उपस्थित राहण्याचे निमंत्रण ना. रामदास आठवले यांनी अच्युता सामंता यांना यावेळी जाहिरपणे दिले.
कलिंग विद्यापिठाला ज्या काही अडचणी येतील त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी यावेळी दिले. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेतला पाहिजे. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन ही विकसीत केला पाहिजे असे आवाहान ना. रामदास आठवले यांनी केले. यावेळी ना. रामदास आठवले यांचा भव्य सत्कार कलिंग विद्यापिठाच्या वतीने करण्यात आला.




