टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 48 धावांनी दणदणीत विजय ! वॉशिंग्टनची ‘सुंदर’ कामगिरी; मालिकेत 2-1 ने घेतली आघाडी
गिल-वॉशिग्टनच्या जोरावर भारताचा ‘सुंदर’ विजय, ऑस्ट्रेलिया धुव्वा उडवत मालिकेत २-१ ने घेतली आघाडी
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : भारतीय संघाने नव्या मैदानात जुने तेवर दाखवू देत १६७ धावांचा यशस्वी बचाव करत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. चौथ्या टी-२० सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने १६७ धावा करत ऑस्ट्रेलियासमोर १६८ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून फिरकीची जादू आणि जलदगती गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाला १८.२ षटकात ११९ धावांवर रोखत भारतीय संघाने हा सामना ४८ धावांनी जिंकला. या विजयासह भारतीय संघ आता मालिका गमावणार नाही हे स्पष्ट झाले आहे. ब्रिस्बेनच्या मैदानात टीम इंडिया मालिका विजयासाठी मैदानात उतरेल.




