जिथे रिपब्लिकन पक्षाला जागा सुटणार नाही तिथे स्व:बळावर उमेदवार निवडूण आणा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन

0

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महायुतीतुन लढणार , महाड येथे प्रचंड पावसात रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई /महाड : मुंबई महापालिकेसह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकित रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत निवडणुका लढणार आहे.ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेत रिपब्लिकन पक्षाला समाधानकारक जागा सोडण्यात येणार नाहीत त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाने स्वबळावर आपले उमेदवार निवडूण आणून रिपब्लिकन पक्षाची राज्याच्या राजकारणावर आपली चांगली छाप निर्माण करावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

महाड येथे चांदे मैदानात रिपब्लिकन पक्षाच्या 69व्या वर्धापनदिनानिमित्त आयेजित जाहिर सभेत ना.रामदास आठवले बोलत होते.प्रंचड मुसळधार पाऊस महाड येथे कोसळत असताना या भरपावसात रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.परिवर्तन कला महासंघाच्या गायकांनी भिमगीते सादर केली.ती भिमगीते आणि केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांचे भाषण भरपावसात श्रोत्यांनी ऐकले.यावेळी रिपब्लिकन कार्यकर्त्यांचा उत्साह पावसारखा ओसंडून वाहत होता.

राज्यभरातून रिपब्लिकन पक्षाचे हजारो कार्यकर्ते महाड शहरात आले होते.रिपाइं च्या वर्धापन दिना निमित्त महाड शहर हे रिपाइं च्या निळ्या झेंड्यांनी निळे निळे झाले होते.सभेच्या पुर्वी ना.रामदास आठवले यांनी ऐतिहासिक चवदार तळ्यावर जाऊन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. महाड हे शहर आंबेडकरी चळवळीची क्रांतिभूमी प्रेरणाभुमी आहे. या भुमीमध्ये रिपब्लिकन पक्षाचा 69वा वर्धापनदिन आयोजित केल्याबद्दल सर्वांनी ना.रामदास आठवले यांचे अभिनंदन केले.

यावेळी विचार मंचावर राज्याचे फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री ना. भरतशेठ गोगावले उपस्थित होते. ना. भरतशेठ गोगावले यांनी ना.रामदास आठवल यांचे पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत केले.

येत्या 20 मार्च 2027 मध्ये महाडच्या चवदार तळ्याच्या क्रांतीला 100 वर्ष पुर्ण होत आहेत.त्या निमित्त चवदार तळे आणि महाड शहारातील क्रांतीस्तंभ सर्व क्रांतीभुमी चे सौंदर्यीकरण;विकास कामे करण्यात येतील.अमृतसर गोल्डन टेम्पल च्या तलावाच्या धरतीवर चवदार तळ्याचे जल शुध्दीकरणाचा प्रकल्प उभारण्यात येईल असे ना. भरतशेठ गोगावले यांनी जाहीर केले.

येत्या 2027 मध्ये चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला 100 वर्ष पुर्ण होत आहेत. या शताब्दी वर्षाचा भव्य सोहळा महाड येथे साजरा करण्यात येईल त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीने भरीव निधी आणुन महाड चवदार तळे क्रांतिभूमी असलेल्या या ऐतिहासिक महाड शहराचे रुपडे पालटण्यात येईल असे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले.

राज्य भरातुन आलेल्या रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी भरपावसात सभा ऐकल्याबद्दल ना.रामदास आठवले यांनी कार्यकर्त्याचे अभिनंदन केले. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवली पाहिजे.त्यासाठी केवळ बौध्दवाड्यांमध्ये ; बौध्द वस्ती मध्ये रिपब्लिकन पक्षाची शाखा नको,तर सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन गावागावात रिपब्लिकन पक्षाची शाखा स्थापन केली पाहिजे.

गावागावत रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा फडकला पाहिजे.सर्व समाजाल सोबत घेतले पाहिजे.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एका जाती धर्माचा पक्ष नसुन सर्व जाती धर्मीयांचा पक्ष आहे.सर्व जाती धर्मीयांना रिपब्लिकन पक्षाशी जोडण्याचे आवाहान ना.रामदास आठवले यांनी यावेळी केले. यावेळी सौ. सीमाताई आठवले आणि त्यांचे पुत्र जीत आठवले यांचा भव्य सत्कार यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपाइंचे राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सूत्रसंचालन गौतम सोनवणे, यांनी केले. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, कार्याध्यक्ष बाबुराव कदम आणि संयोजन कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे, रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, राहुल सोनावले, युवा आघाडी राज्य अध्यक्ष पप्पू कागदे ,परशुराम वाडेकर, रमेश मकासरे, काका खांबलकर, सुरेश बार्शिंग, पंबई प्रदेशअध्यक्ष सिद्धार्थ कासारे, विवेक पवार ,अमित तांबे, सचिन कासारे, अजित रणदिवे, ॲड आशाताई लांडगे, शिलाताई अनिल गांगुर्डे, उषाताई रामलू, नैना वैराट , स्वप्नाली जाधव, निषाद बशीर, अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे, सूर्यकांत वाघमारे, उत्तमदादा कांबळे, इतर मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या