दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संचालक पदी हेमराज बागुल रुजू
B1न्यूज मराठी नेटवर्क
नवी दिल्ली : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संचालकपदाचा कार्यभार संचालक हेमराज बागुल यांनी नुकताच स्वीकारला.
महाराष्ट्र शासनाच्या नवी दिल्लीतील निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती आर विमला यांनी बागुल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनिषा पिंगळे यावेळी उपस्थित होत्या.
बागुल महासंचालनालयातील ज्येष्ठ संचालक असून ते मंत्रालयातील मुख्यालयात संचालक (प्रशासन) या पदावर कार्यरत होते. त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी तसेच महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभाग आणि औरंगाबाद-लातूर विभागाच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. शासकीय सेवेत येण्यापूर्वी बागुल यांनी पत्रकारितेत उल्लेखनीय योगदान दिले आहे. तसेच साहित्यविषयक विविध प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनीही बागुल यांना सन्मानित करण्यात आले आहे.




