सूर्यकांत गुंड सर लाडोळे यांचा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी पहिला अर्ज दाखल , माजी सभापती रणवीर भैय्या राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत नामांकनाचा शुभारंभ
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक २०२५ साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आज सुरुवात झाली असून, या निवडणुकीचा पहिला अर्ज सूर्यकांत गुंड सर (लाडोळे) यांनी मोठ्या उत्साहात दाखल केला.
यावेळी माजी सभापती रणवीर भैय्या राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अर्ज दाखल करताना अभिजीत कापसे, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. रणजीत गुंड, दिनकर गुंड, दत्तप्रसाद पाटील, तसेच वानेवाडी ग्रामपंचायतीचे चेअरमन रमेश यादव आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या प्रसंगी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सूर्यकांत गुंड सरांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्ज दाखल कार्यक्रमामुळे लाडोळे परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. स्थानिक शेतकरी व व्यापारी वर्गाकडून गुंड सरांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आगामी निवडणुकीत त्यांची उमेदवारी निर्णायक ठरू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.




