कॉम्रेड शाहीर अमर शेख यांना जयंती निमित्ताने कम्युनिस्ट पक्षाकडून अभिवादन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटनांच्या वतीने कॉम्रेड शाहीर अमर शेख यांच्या जयंती निमित्ताने बार्शी येथील पुतळा पार्क मधील कॉम्रेड शाहीर अमर शेख यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कॉम्रेड अमर शेख यांच्या जयजयकाराच्या व लाल सलामच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी कॉम्रेड प्रा. डॉ. राजन गोर (रायगड ) यांनी कॉम्रेड अमर शेख यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत संयुक्त महाराष्ट्र इतिहास, कम्युनिस्ट पक्षातील सहभाग, बार्शीतील शेतकऱ्यांचा लढा त्यासोबत शाहिरीबाणा याबद्दल माहिती सांगितली.
एवढी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड प्रवीण मस्तुद , अनिरुद्ध नकाते, आनंद गुरव, आनंद धोत्रे, धनाजी पवार , भारत भोसले, भारत चव्हाण , सुहास माने , संपत खताळ, शाहपरी शेख, निर्मला सरवदे, विशाल लालबेग आदी उपस्थित होते.




