अशोक नागटिळक महाराज यांचा वाढदिवस विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमाने साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क
वैराग प्रतिनिधी : गौतम नागटिळक
वैराग : मानवता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक नागटिळक महाराज यांच्या वाढदिवसा निमित्त सहारा वृद्धाश्रम गौडगांव येथील धान्य किराणा माल देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. अशोक नागटिळक यांचा वाढदिवस विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.
अशोक नागटिळक महाराज यांचा वाढदिवस वयोवृद्ध लोकांमध्ये साजरा करण्यात आला. सहारा वृद्धाश्रम गौडगांव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल भड यांच्या वर्तीने अशोक नागटिळक यांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी विविध मान्यकारांचे सत्कार करण्यात आले. त्यावेळी मानवता बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव बापू नागटिळक उपाध्यक्ष गौतम नागटिळक परमेश्वर बिले , भैरवनाथ चौधरी, राहुल गुरव , राहुल भड, किरण खुरंगळे , आकाश बनसोडे , रमेश नागटिळक , निलेश गिराम , आप्पा स्वामी , आप्पा हिवरे , सूरज मिसाळ , विष्णू शिंदे , बाळू नागटिळक, श्रीराज हजारे व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तवना भैरवनाथ चौधरी , सूत्रसंचालन राहुल भड तर आभार प्रदर्शन गौतम नागटिळक यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन मानवता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने राबविला होता.