पूरग्रस्तांना, बार्शीतील लाल बावटेवाल्यांची; शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या विचारांना स्मरूण मदत
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आयटक संलग्न गोकुळ दूध संघ कामगार संघटना कोल्हापूर तसेच माढा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, आयटक कामगार केंद्र बार्शी, यांच्या संयुक्त वतीने सीना नदीच्या पुराने नुकसान झालेले माढा तालुक्यातील उंदरगाव केवड या गावातील पूरग्रस्तांना सतरंजी – ब्लॅंकेट त्याचप्रमाणे किराणा साहित्याचे किट असे एकूण सर्व 60 हजार रुपयांचे साहित्य कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली वाटप करण्यात आले.
यावेळी कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे म्हणाले “संवेदना जाग्या झालेल्या कामगारांनी; पूरग्रस्तांना केलेल्या मदतीला हात लावला आहे; शेतकरी अडचणीत असताना त्याला कामगारांनी मदत करण्याचा आपला इतिहास आहे; गरिबांनी गरिबाला अडचणीत हात देणे या शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या विचारांना घेऊन हे काम आम्ही करीत आहोत.”
यावेळी रामचंद्र माने आयटकचे जिल्हा सचिव कॉम्रेड ए.बी. कुलकर्णी, माढा आयटक ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सतिश गायकवाड, मुबारक मुलाणी, सुरेश कुंभार, ओहाळ, दिपक भोसले, अमर सय्यद, राजेश ढगे, संजय ओहोळ तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड प्रविण मस्तुद , बांधकाम कामगार संघटनेचे कॉम्रेड अनिरुद्ध नखाते आदी उपस्थित होते.




