ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी ११,००० हजारचा चेक बार्शी तहसीलदार यांच्याकडे सुपूर्त
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आपल्या महाराष्ट्र राज्यात यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे जिल्ह्यातील व राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होऊन मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
राज्यावर आलेल्या संकट पाहता ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी या संस्थेकडून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ११,००० हजार बार्शी तहसीलदार एफ.आर.शेख यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी, अजय तिवारी, नागनाथ सोनवणे, सुनील फल्ले, माणकोजी ताकभाते, संतोष हाडगे, प्रा. चंद्रकांत उलभगत सायरा मुल्ला, रेखा विधाते, रागिनी झेंडे,आलका हाडगे हे उपस्थित होते. हा निधी संस्थेकडे जमा असलेल्या निधीतून देण्यात आला असे अध्यक्ष राहुल वाणी यांनी सांगितले.




