बार्शी वकील संघाकडून अतिवृष्टिमुळे पुरात वाहून गेलेल्या व आत्महत्या केलेल्या कुटुंबियास आर्थिक मदत
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील बार्शी वकील संघाच्या सर्व वकिलांनी एकत्र येऊन बार्शी तालुक्यातील पुरपरिस्थिती व अतिवृष्टिमुळे नुकसान झालेल्या,आत्महत्या केलेल्या व पुरात वाहून गेलेल्या कुटुंबियाना आर्थिक मदत करण्यासाठी निधी जमविला होता.
यावेळी बार्शी वकील संघाच्या झालेल्या बैठकीत सामाजिक जबाबदारी म्हणून बार्शी तालुक्यातील अतिवृष्टित पुरात वाहून गेलेल्या व आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना प्रत्येकी ५१००० रुपये मदत करण्याचे ठरले होते. त्यानुसार गौडगाव येथील पुरात वाहून गेलेले मयत रामेश्वर केशव शिराळकर यांच्या मुलीस कु. हेमा रामेश्वर शिराळकर तसेच मौजे दहिटणे येथील अतिवृष्टीस कंटाळून आत्महत्या केलेले शेतकरी लक्ष्मण काशीनाथ गवसाने यांचे वारस कु. शिवकन्या लक्ष्मण गवसाने व मयताचा मुलगा व इतर नातेवाईक यांना बार्शी वकील संघाच्या बार रुममध्ये प्रत्येकी ५१००० रुपयांचा धनादेश बार्शी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. रणजीत गुंड यांनी दिला.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. हर्षवर्धन बोधले यांनी केले तर आभार प्रदर्शन लायब्ररी चेअरमन अॅड.अमोल आलाट यांनी केले. यावेळी कार्यक्रमासाठी बार्शी वकील संघाचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.




