वंचित आघाडीच्या वतीने सरन्याधिशावर हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून भारताचे मुख्य सरन्यायधीश भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर तिवारी याने सर्वोच्च न्यायलायाच्या परिसरात हल्ला केल्याच्या निषेधार्थ तहसीलदार एफ. आर. शेख यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी निवेदनात हल्ला करणाऱ्या तिवारीवर रासुका, देशद्रोहानुसार गुन्हा व त्याचे नागरिकत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी वंचित आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड.विवेक गजशिव, शहराध्यक्ष धनंजय जगदाळे, आनंद काशिद, अश्वकुमार अहिरे, बाळासाहेब कदम, बाबासाहेब खडसरे यांनी आपल्या मनोगतातून निषेध व्यक्त केला. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आनंद काशिद यांनी आंदोलनास पाठिंबा देऊन निषेध व्यक्त केला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अॅड.विवेक गजशिव, शहराध्यक्ष धनंजय जगदाळे, आनंद काशिद, अश्वकुमार अहिरे, बाळासाहेब कदम, बाबासाहेब खडसरे, राहुल शिंदे, किरण भालशंकर, शामसुंदर शर्मा, रोशन शिंदे, गौतम वाघमारे, विजय शिंदे, वसंत शिंदे, विश्वास भोसले,बालाजी अंधारे, संजय खुरंगळे, अतिश बनसोडे, परमेश्वर चांदणे तसेच महिला पदाधिकाऱ्यांमध्ये शहराध्यक्ष रेखा सरवदे, अंजली धांडोरे, सुलक्षणा खुणे, शामल सरवदे,शामल लोकरे, जनाबाई लोकरे, साधना लोकरे, मैनाबाई अंकुशराव आदी महीला पदाधिकारी उपस्थित होत्या.




