उघड्या घरात प्रवेश करुन केलेल्या चोरीतील आरोपी अवघ्या ०३ तासांत जेरबंद

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी, दि. 29 सप्टेंबर 2025 : बार्शी शहर पोलिसांनी आपल्या तत्परतेने आणि तांत्रिक कौशल्याने पुन्हा एकदा गुन्हेगारांना धडा शिकवला आहे. अवघ्या तीन तासांत ३ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणातील आरोपी नागेश राजू बगाडे (वय ३२, रा. झाडबुके मैदानामागे, पाण्याच्या टाकीजवळ, बार्शी) याला चोरीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी सायं. 6.15 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी विलास दत्तात्रय सुरवासे हे भगवंत मंदिरात असताना त्यांच्या घरी अज्ञात चोरट्याने उपघड्या दारातून प्रवेश करून घरातील तिजोरी फोडली व ३ लाख ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेनंतर फिर्यादीने तात्काळ बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. गुन्हा क्रमांक 786/2025, भारतीय न्याय लैंहिता (BNS) कलम 305 अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपासाची जबाबदारी पोहेकों/488 साठे यांच्याकडे सोपवण्यात आली.

गुन्हा नोंदवताच पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला कामाला लावले. शहरातील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे केवळ तीन तासांत आरोपी नागेश राजू बगाडे याला रिंग रोड, बार्शी येथून चोरीच्या संपूर्ण मुद्देमालासह अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम बावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोसई उमाकांत कुनोर, सपाफी अजित बरपे, पोहेको/1667 माने, पोहेको/164 डबड, पोहेको/488 साठे, पाका 2132 फत्तेपुरे, पोकां/2111 जाधव, पौकों/787 पवार, पोका/200 उदार, पोका/1974 देशमुख, पोकों/1195 नितनात, पोकों/595 बहिरे, पोकों/1860 शेख, पोकों/1504 उघडे आणि पोका/918 मांगे यांनी मोलाची कामगिरी बजावली.

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पथकाचे अभिनंदन करताना सांगितले की, “आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि पथकाच्या समर्पित प्रयत्नांचा उपयोग करून आम्ही आरोपीला अल्पावधीत पकडण्यात यशस्वी ठरलो. यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबाबतचा विश्वास दृढ होईल.”

नागरिकांना आवाहन :
घरातून बाहेर पडताना दार – खिडक्या नीट बंद कराव्यात. संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 100 किंवा 112 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बार्शी शहर पोलिसांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या