बार्शी तालुक्यातील पांगरी येथे माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : राष्ट्रनेता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभाग यांच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व बार्शी तालुक्यातील पांगरी येथे माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
प्रत्येक गाव समृद्ध झाले तर, राज्यही समृद्ध होईल या उद्देशाने राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला असून हे अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर याकालावधी पर्यंत राबविले जाणार आहे. या अभियानात सुशासन युक्त पंचायत, सक्षम पंचायत, जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा अशा विविध घटकांवर त्या त्या ग्रामपंचायतीला गुण दिले जाणार आहेत.
बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनामार्फत 17 सप्टेंबर पासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ ही केवळ स्पर्धा नसून ग्रामीण विकासाची एक दिशा आहे,या अभियानात सर्व अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व बार्शी तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून अभियान यशस्वी करावे असे माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.
यावेळी प्रांतअधिकारी सदाशिव पडदुणे,ॲड.अनिल पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सुहास देशमुख,माजी सभापती विजय गरड, सोसायटी चेअरमन युवराज खबाले,सोसायटी व्हा.चेअरमन रामलिंग गोडसे,माजी सरपंच बाळासाहेब मोरे,धनंजय खवले,सरपंच सौ.मनिषा धस,उपसरपंच सौ. प्रमिला नारायणकर, शहाजी धस, माजी उपसरपंच सतिश जाधव, डाॅ. विलास लाडे तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




