बार्शी न्यायालयातील राष्ट्रीय महालोकअदालतीत ३८७१ प्रकरणे तडजोडीने निकाली; तब्बल २६ कोटी ८७ लाखांची वसुली

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे अध्यक्ष मा. श्री. एम. एस. शर्मा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी न्यायालयात आयोजित राष्ट्रीय महालोकअदालतीत तब्बल ३८७१ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. यातून २६ कोटी ८७ लाख ४१ हजार २७२ रुपयांची वसुली झाली.

या लोकअदालतीत प्रलंबित दिवाणी, तडजोडपात्र फौजदारी तसेच दाखलपूर्व असे एकूण ११ हजार ७५७ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील ३७३ दिवाणी, ३४९८ दाखलपूर्व आणि अन्य तडजोडपात्र खटले सोडवले गेले.

महत्त्वाचे म्हणजे, मोटार अपघात प्रकरणांतील ६ प्रकरणांत ५१ लाख ८ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर.

एन. आय. अॅक्ट कलम १३८ अंतर्गत ३६ प्रकरणांत २४ कोटी ३७ लाख ६० हजार रुपयांची वसुली.

रक्कम वसुलीच्या १७ प्रकरणांत १ कोटी ४ लाख ९३ हजार रुपयांची वसुली.

फौजदारी व कबुलीच्या एकूण २२० प्रकरणांत २ लाख २८ हजार रुपयांचा दंड वसूल.

बार्शी न्यायालयातील सहा पॅनलसमोर ही प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये जिल्हा न्यायाधीश-१ मा. विक्रमादित्य के. मांडे साहेब, जिल्हा न्यायाधीश-२ श्रीमती व्ही. एस. मलकलपट्टे-रेड्डी मॅडम यांच्यासह अन्य न्यायाधीश सहभागी झाले होते.

या महालोकअदालतीत वकिल संघ बार्शीचे अध्यक्ष रणजित गुंड, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस, बँका, फायनान्स कंपन्या, नगरपरिषद, पंचायत समिती तसेच विज वितरण कंपनीचे प्रतिनिधी यांनी विशेष सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या