जैववैद्यकीय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे – गोरक्ष लोखंडे

0

इस्लामपूर, आष्टा येथील बैठकीत निर्देश आर्थिक दुर्बल, अनुसूचित जाती जमातीसाठीच्या निधीचा घेतला आढावा

B1न्यूज मराठी नेटवर्क

सांगली, दि. 9 : जैव वैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) पर्यावरणासाठी घातक असून त्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. याबाबत शहरातील सर्व खाजगी रूग्णालयांना नोटीस द्यावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य (सचिव दर्जा) गोरक्ष लोखंडे यांनी आज दिले.

इस्लामपूर व त्यानंतर आष्टा नगरपरिषदेतील सभागृहात आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी इस्लामपूर येथील बैठकीत मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, उपमुख्याधिकारी डॉ. भगवान खाडे, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे वरिष्ठ सहाय्यक ए. के. शेख तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी लोखंडे यांनी महसूलाचे एकूण 5 टक्के निधी आस्थापना, वजा खर्च, आर्थिक दुर्बल घटकावर केलेल्या खर्चाचा मागील 5 वर्षांचा आढावा तसेच अनुसूचित जाती जमाती साठी प्राप्त होणाऱ्या निधीबाबतचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी लोखंडे यांनी नगरपरिषदेकडील आरोग्य, आवास योजना, आस्थापना, लेखा आदि विभागांचा आढावा घेऊन सफाई कामगार व त्यांची रिक्त पदभरती करण्याबाबत संवाद साधला. सफाई कामगारांना मिळणाऱ्या सोयीसुविधांबाबत माहिती जाणून घेऊन साफसफाईची कामे करताना आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजाबाबत काही अडीअडचणी असल्यास त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत त्यांनी आश्वासित केले. यावेळी त्यांनी निर्माण केलेली संविधानाविषयी माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली.

प्रारंभी लोखंडे यांना संविधान उद्देशिका असलेली प्रतिमा भेट देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली. आष्टा येथे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी आष्टा नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या