मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे लोकायुक्त अभियान – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

रायगड, दि. 08 : ग्रामविकास मंत्रालयाकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे लोकायुक्त अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान राबविण्यात येणार आहे. गावांचा विकास होण्याच्या दृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल आहे. या अभियानात सर्व ग्रामस्थांनी मिळून एकत्रित काम केल्यास गावांचा विकास शक्य असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले. रायगड जिल्हा परिषद अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा कुरुळ येथील आरसीएफ सभागृहात पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी रोहयो मंत्री भरत गोगावले,यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, प्राथमिक शिक्षण अधिकारी ललिता दहीतुले, माध्यमिक शिक्षण अधिकारी महारुद्र नाळे, आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांच्यासह जिल्हा परिषद खातेप्रमुख, गट विकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच उपस्थित होते.

यावेळी कु.तटकरे म्हणाल्या की, ग्रामपंचायत म्हणजे राज्य व केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे सर्वोत्तम साधन आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सात घटकांवर आधारित आहे. सर्व ग्रामस्थांनी मिळून एकत्रित काम केल्यास गावांचा विकास शक्य आहे. गाव अधिकाधिक स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत तसेच जलसमृद्ध गाव करणे हा प्रमुख दृष्टिकोन असावा, असे आवाहनही मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
गावांचा शाश्वत व सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत योजना जनतेच्या दारी पोहोचतील. गाव सक्षम असेल तर जिल्हा सक्षम होईल, जिल्हा सक्षम झाला तर राज्य आणि राज्य सक्षम झाले ते देश सक्षम होईल. सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या