बार्शीत ‘नशामुक्त गाव अभियान’ला बार्शी तहसील आणि आयुष व्यसनमुक्ती यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरुवात

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तहसील कार्यालय आणि आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्र, जामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत नशामुक्त गाव अभियान कार्यशाळा यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात पार पडली. महसूल विभागातील अधिकारी, पोलिस पाटील आणि गावपातळीवरील महत्त्वाच्या घटकांनी या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.5000कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कोडेतवार, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, तहसीलदार एफ.आर. शेख, माढा तहसीलदार संजय भोसले, आयुष केंद्राचे संचालक डॉ. संदीप तांबारे, निवासीनायब तहसीलदार सुभाष बदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी डॉ. कोडेतवार यांनी “नशामुक्त गाव अभियान हे नशामुक्त भारताकडे जाणारे अत्यावश्यक पाऊल आहे,” असे सांगत बार्शी तालुक्यात या अभियानातून उत्तम कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला. डॉ. संदीप तांबारे यांनी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, महिलांसाठी मेळावे, नशाविरोधी रॅली, ग्रामसभेत ठराव, उपचार व पुनर्वसन सुविधा अशा विविध उपक्रमांची माहिती दिली.

तहसीलदार शेख यांनी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर “संपूर्ण तालुका नशामुक्त करण्याची ही सुवर्णसंधी” असल्याचे सांगत सर्व अधिकाऱ्यांना एकत्रितपणे कृती करण्याचे आवाहन केले.

बार्शी व माढा तालुक्यातील नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी, महसूल कर्मचारी आणि पोलिस पाटील अशा सुमारे २०० जणांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. यावेळी तणामुक्ती तंत्रांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली आणि उपस्थितांनी नशामुक्त भारताची शपथ घेतली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नील जाधव, अश्विनी कुंभार, मनीषा शिंदे, सूरज पवार, सोहेल शेख, मृदुल हजारिका, सुजित ढेकळे यांनी विशेष परिश्रम घेतले.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या