योग साधना ही भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
B1न्यूज मराठी नेटवर्क
नवी दिल्ली : भगवान गौतम बुध्दांनी मेडीटेशन विपश्यना साधना करुन त्यांना ज्ञान प्राप्ती झाली.त्या ज्ञान प्राप्तीमुळे भगवान बुध्दांनी जगाला विश्वशांतीचा विचार दिला. योगामुळे शरीर आणि मन निरोगी राहते त्यामुळे आता सर्व जगाला योगाच महत्व पटलेले आहे.योग ही भारताने जगाला दिलेली मोठी देणगी आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
ग्रेटर नोएडा येथे आयुर्वेद एक्सपो आणि एल्डर केअर च्या उद्घाटन सोहळ्यात ना.रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या एक्सपो चे आयोजक डॉ.नितीन अग्रवाल, प्रसिध्द अभिनेते गगन मल्लीक, प्रिन्स मल्लीक, लाहोटी आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 साला पासुन 21 जुन हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणुन साजरा करण्याची परंपरा सुरु केली.21 जुन या आंतरराष्ट्रीय योग दिनाची मोदींनी मान्यता मिळवून दिली. आंतरराष्ट्रीय योगदिनामुळे जगभरात योग साधनेचे महत्व पटवून देण्यात मोदी यशस्वी झाले आहेत. आयुर्योग एल्डर केअर एक्सपो हे चांगले उपक्रम आहेत. ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणाऱ्या तसेच आरोग्यासाठी योगाचे महत्व सांगणाऱ्या उपक्रमांना भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालया द्वारे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वास ना.रामदास आठवले यांनी यावेळी दिले.




