कोल्हापूरन्याय विभागमहाराष्ट्रमुंबई

कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ मंजूर

आता कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ, दीर्घ लढ्याला मोठं यश, नोटिफिकेशनही जारी!

B1न्यूज मराठी नेटवर्क

कोल्हापूरकरांच्या गेल्या 40 वर्षांच्या लढ्याला यश मिळालं असून कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ कार्यरत होणार आहे.

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे नोटिफिकेशन जारी करण्यात आलं असून येत्या 18 ऑगस्टपासून खंडपीठाचं काम सुरू होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींकडून 1 ऑगस्ट रोजी याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामुळे कोल्हापूर, सांगलीसह सहा जिल्ह्यांच्या 40 वर्षांच्या लढ्याला यश मिळालं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांनीही त्याची माहिती सर्वप्रथम माजी खासदार संभाजीराजेंना दिल्याचंही समोर आलं.

कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे ही मागणी अनेक वर्षांपासून मागणी होती. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार होता. परंतु याचा निर्णय होत नव्हता. त्यासाठी अनेक आंदोलनं करण्यात आली. आता या लढ्याला मोठं यश मिळालं आहे.

सातारा,सांगली,सिंधुदुर्ग ,रत्नागिरी ,सोलापूर ,कोल्हापूर या सहा जिल्ह्य़ातील जनतेचा विजय!!!

दि. १८ ऑगस्ट पासून प्रत्यक्ष कामकाज प्रारंभ!!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button