बार्शीत १ लाख ५८ हजार ५२४ रु गुटखा जप्त , विक्रेत्यांवर गुन्हा दाखल, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी शहरात अन्न व औषध प्रशासन, सोलापूर यांच्याकडून अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 नुसार प्रतिबंधित अन्न पदार्थां विरुद्ध कारवाई करण्यात आली. साहेबराव देसाई, सहायक आयुक्त (अन्न), सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी .चन्नवीर स्वामी व उमेश भुसे यांच्या पथकाने दिनांक 31 जुलै 2025 रोजी बार्शी शहरातील खालील दोन ठिकाणी अचानक धाड टाकून तपासणी केली.
मे. ए.एच ट्रेडर्स, मालक . रिझवान रहिमान तांबोळी, लता टॉकीज शेजारी, बार्शी. मे. गजानन ट्रेडर्स, मालक किरण शंकर कल्याणी, आडवा रस्ता, गणपती मंदिराजवळ, बार्शी. तपासणी दरम्यान या ठिकाणी प्रतिबंधित गुटखा जसे की – बादशाह, के.आर. गुटखा, आर.एम.डी. पान मसाला, विमल पान मसाला, डायरेक्टर सुगंधित सुपारी इत्यादी मोठ्या प्रमाणावर आढळून आले. सदर गुटखा विक्री कायद्याने विक्रीस निषिद्ध असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
या दोन्ही दुकानातून एकूण रु. १,५८५२४ /- किमतीचा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त करण्यात आला असून, सदर मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी यांनी पुढील कायदेशीर कारवाई करत पुढील व्यक्तींविरुद्ध बार्शी पोलिस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 605/2025 अन्वये फिर्याद दाखल केली आहे.
रिझवान रहिमान तांबोळी पुरवठादार तांबोळी शेख मिलन किरण शंकर कल्याणी राम डोंबे तांबोळी ही संपूर्ण कारवाई साहेबराव देसाई, सहाय्यक आयुक्त (अन्न) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.




